कॅप्टन रुपचंद सोनवणे यांना समाजभूषण पुरस्कार नाभिक समाजाचे माजी कॅप्टन रुपचंद सोनवणे यांना नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचार...
कॅप्टन रुपचंद सोनवणे यांना समाजभूषण पुरस्कार
नाभिक समाजाचे माजी कॅप्टन रुपचंद सोनवणे यांना नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने समाज भुषण पुरस्कार जाहीर
![]() |
| मा. कॅप्टन रुपचंद सोनवणे |
नंदुरबार : प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नाभिक समाजाचे माजी कॅप्टन रुपचंद सोनवणे यांना नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने समाज भुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दि.८ जून रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाभिक समाजाचे ज्येष्ठ समाज सेवक वाका चार रस्ता येथील रहिवासी, सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन रूपचंद सोनवणे यांना नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने सन २०२४ चा मानाचा समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. रूपचंद सोनवणे यांनी देश सेवा केलेली असून कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते संस्थेचे सभासद असून संस्थेला मार्गदर्शन करतात तसेच वेळोवेळी आर्थिक मदतही करतात. त्यांच्या सामाजिक आणि देशसेवेच्या कार्याबद्दल त्यांना संस्थेमार्फत समाजभूषण पुरस्कार सर्वानुमते जाहीर करण्यात आला आहे. येत्या ८ जून २०२४ श्री राष्ट्रसंत संत संत सेना महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

No comments