adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"जगभर बंदी असलेले घातक २७ कीटकनाशके देशात बंद करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ज्ञ २०१५पासून प्रयत्न

 "जगभर बंदी असलेले घातक २७ कीटकनाशके देशात बंद करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ज्ञ २०१५पासून प्रयत्न करीत आहेत  खतांच्या किमती कमी होनेबाबत ...

 "जगभर बंदी असलेले घातक २७ कीटकनाशके देशात बंद करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ज्ञ २०१५पासून प्रयत्न करीत आहेत


 खतांच्या किमती कमी होनेबाबत संसदेत आवाज उठवणे  साठी शेतकरी कृती समितीचे शरद पवार यांना निवेदन....

प्रतिनिधी चोपडा

(संपादक:हेमकांत गायकवाड)

 ...जगभर विषमुक्त अन्न खाण्यासाठी सारे देश प्रयत्न करीत असताना  भारतीय शास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या तीन समित्यांनी २७ कीटकनाशकांवर बंदी घालायचे सांगून देखील २०१५पासून सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळे कारणे देवून  कंपन्या स्थगिती घेत आहेत,ती सारे देशभक्त असल्याने भ्रष्ट लोकांच्या कह्यात आले नाहीत,आता परत समिती नेमून फक्त ५ वरच बंदी घालावी अशी शिफारस करून घेतली.सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तुम्हाला हवी तशी शिफारस येई पर्यंत समित्या नेमायच्या का?असा तिखट प्रश्न विचारला व त्याचे कारण विचारले?त्यावर अजून उत्तर नाही.


हा प्रश्न देशातील साऱ्या १५० कोटी जनतेला संपवण्याचा कट असून त्या साठी संसदेत आवाज उठवावा अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

   तसेच गेल्या काही वर्षात जगभर रासायनिक खतांचे दर कमी झाल्यावर देखील कंपन्यांनी अनुदाने घेवून देखील दुप्पट ते तिप्पट भाव वाढ केली,त्यासाठी त्यांच्या नफा वर नियंत्रण साठी प्रयत्न व्हावेत.डाळ व खाद्यतेलांच्या आयातीवर लाखो कोटी खर्च होऊन जनतेला हृदयविकार व कॅन्सर चे विळख्यात ढकलण्या ऐवजी तेवढाच खर्च देशांतर्गत भावांतर योजनेवर खर्च करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्या संदर्भात व वसुली संदर्भात मास्टर सर्क्युलर  काढलेले असते त्या प्रमाणे कोणतीही बँक वागत नाही.त्यांना बंधनकारक करणेसाठी यंत्रणा कठोर करावी, तसेच माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रे यांनी आत्महत्या कमी करण्या संदर्भात जे उपाय सुचवले आहेत त्यावर अंमलबजावणी करणेबाबत उपाययोजना करावी.पीक विमा योजना अधिक कार्यक्षम करणेसाठी अभ्यासू लोकांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण संसदेत  प्रयत्न करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी समन्वयक एस बी पाटील,रमेश सोनवणे,कुलदीप राजपूत, ॲड कुलदीप पाटील,प्रफुल्ल राजपूत,पंकज कोळी यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.



No comments