आता लग्नाचे प्रमाणपत्र बनवताना हुंड्याची माहिती द्यावी लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आदेश जारी केले हुंड्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर कर...
आता लग्नाचे प्रमाणपत्र बनवताना हुंड्याची माहिती द्यावी लागणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने आदेश जारी केले
हुंड्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर करणे बंधनकारक
लखनौ: वृत्तसंस्था
(संपादक: हेमकांत गायकवाड)
उत्तर प्रदेशमध्ये विवाह प्रमाणपत्र मिळवताना आता वधू-वरांना हुंड्याचा तपशीलही द्यावा लागणार आहे. या संदर्भात शासनाने नोंदणी विभागाला सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी हजारो अर्ज येतात. नियमानुसार लग्नपत्रिका, आधारकार्ड, हायस्कूल मार्कशीटसह दोन साक्षीदारांची कागदपत्रेही वधू-वरांच्या बाजूने सादर केली जातात. आता हुंड्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठीची नोटीसही कार्यालयात लावण्यात आली आहे. या शपथपत्रात लग्नासाठी दिलेल्या हुंड्याची माहिती द्यावी लागेल. अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लग्नासाठी प्रतिज्ञापत्र अनिवार्य केले असून प्रत्येकाला हुंडयाचा पुरावा कागदपत्रासह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
No comments