adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के रक्कमेच्या लाचेची मागणी

  प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के रक्कमेच्या लाचेची मागणी धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प...

 प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के रक्कमेच्या लाचेची मागणी

धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रकार ९३ हजाराची लाच मागणी तर ५४ हजाराच्या लाचेचा केला स्विकार  


प्रतिनिधी धुळे

(संपादक : हेमकांत गायकवाड)

धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रकार ९३ हजाराची लाच मागणी तर ५४ हजाराच्या लाचेचा केला स्विकारण्यातांना  शुभांगी बनसोडे यांना५४ हजाराची लाच घेताना त्यांना एसीबी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले 

 याबाबत अधिक माहिती अशी की  प्रवासी भत्ता बिलाच्या दहा टक्के रक्कम ९३ हजाराची लाचेची मागणी तर ५४ हजार रुपयांची लाचेचा स्विकार करण धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर येथील महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील शुभांगी बनसोडे यांना चांगलेच भोवले आहे. ५४ हजाराची लाच घेताना त्यांना एसीबी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या लाच प्रकरणातील तक्रारदार पंचायत समिती साक्री अंतर्गत, महिला बालकल्याण केंद्र, पिंपळनेर येथे पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांचे इतर सहा कार्यालयीन सहकारी अशा सर्वांचे ९ लाख ३७ हजार ५३३ रुपये एकत्रित प्रवासी भत्त्याचे बिल मंजुर करण्यात आले होते. या प्रवासी भत्त्याची रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावुन घेतले. प्रवासी भत्ता मंजूर झालेल्या कर्मचाऱ्याचा प्रवासी भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा टक्क्याप्रमाणे एकुण ९३ हजार रुपये जमा करण्यास सर्वांना सांगितले होते.लाचेची ९३ हजार रुपयाची रक्कम जमा करून दिली नाही तर यापुढे भविष्यात प्रवासी भत्त्याची बिले काढून दिली जाणार नाही असे देखील श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी संबंधित सहकारी कर्मचाऱ्यांना बजावले होते. त्यानंतर तक्रारदारांनी ६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली. एसीबी विभागाच्या पडताळणीत अंतिम लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.तक्रारदार यांनी प्रवासीभत्ता जमा झालेल्या काही कर्मचाऱ्यांन कडून त्यांच्या जमा झालेल्या प्रवासीभत्त्याच्या बिला प्रमाणे दहा टक्के अशी ५४ हजार रुपयांची रक्कम जमा करून ती लाचेची रक्कम ७ मे रोजी शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात पंचासमक्ष देण्यात आली. लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना शुभांगी बनसोडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments