सावदा पोलिसांत पुर्वीच्या दाखल चोऱ्यांचे तपास पेंडीग? सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ ! आता दुचाकी चोरीला तपास चक्रे फिरणार का? आठ दिवसांत ...
सावदा पोलिसांत पुर्वीच्या दाखल चोऱ्यांचे तपास पेंडीग? सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ !
आता दुचाकी चोरीला तपास चक्रे फिरणार का? आठ दिवसांत दोन चोरीच्या घटना
रावेर/प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सावदा पोलिस स्टेशन हद्दीतच येथील सावदा शहर भरात पुर्वी झालेल्या चोऱ्यांमध्ये सावदा- फैजपुर रस्त्यावरील न्यू पंजाब हॉटेल मधून सुमारे ६३ हजार, जाकीर कुरैशी यांच्या घरातून ७ लाख शरद , भागवत - भारंबे, देवीदास तायडे, भागवत कासार, अक्रम खान, बासीद - खाटीक यांच्या घरी झालेल्या • चोऱ्या, सोनालि कोल्ड्रिंक सह परिसरातील शेतकरी बांधवांच्या १ शेतातून शेती उपयोगी मौल्यवान साहित्य चोरीस गेल्या बाबतच्या नोंदी सावदा पोलिस ठाण्यात न असून, या चोऱ्यांचा छळा पोलिसांकडून लावण्यात आल्याची बातमी आजपर्यंत समजली नाही.
तसेच सध्या ७ दिवसांपूर्वी सावदा येथील सोमेश्वर नगर मध्ये ज्या धनराज रंगु पाटील यांच्या घरी एकूण ७० हजारांच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केले. त्याच ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे निवासस्थान असूनही घरफोडी झाल्याची घटना ताजी असताना शहरातील गांधी चौक शेख पुरा येथून दि.५ मे रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास खाकीचा कोणताच धाक न बाळगता थंड डोक्याने अज्ञात चोरट्यांनी घरा समोर उभी असलेली सुझुकी कंपनीची एम एच १९ डीवाय २१२१ या क्रं.ची दुचाकी लंपास करून नेल्याची घटना उघडकीस आली असून, सदरील दुचाकी चोरटा कशा निडरपणे पध्दतीने चोरुन नेत असल्या बाबतचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे तरी आठ दिवसांत दोन चोरीच्या घटनांमुळे नागरिक कमालीचे धस्तावले असून, या अनुषंगाने थेट पोलिसांच्या कार्यशैली व कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करित आहे.

No comments