adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थोरपाणी आदिवासी पाड्यावर चोपडा आमदारांची भेट, दुर्घटना स्थळाची पाहणी, मयताच्या कुंटुबास अन्नधान्याची मदत

YouTube Video        ☝ वरती क्लिक करा  व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी YouTube  नावावर क्लिक करा    थोरपाणी आदिवासी पाड्यावर चोपडा आमदारांची भेट, ...


YouTube Video
       ☝वरती क्लिक करा 
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी YouTube  नावावर क्लिक करा 

 थोरपाणी आदिवासी पाड्यावर चोपडा आमदारांची भेट, दुर्घटना स्थळाची पाहणी, मयताच्या कुंटुबास अन्नधान्याची मदत 


प्रतिनिधी : चोपडा

(संपादक: हेमकांत गायकवाड)

यावल : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या गावात वादळात घर कोसळून एकाचं कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सातपुड्याच्या या आदिवासी पाड्यावर बुधवारी चोपडा आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करीत मयतांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणी मयत पावरा यांचे आई,वडील व मुलगा यांना अन्न धान्याची मदत त्यांनी वितरण केली. 


थोरपाणी आदिवासी पाड्यावरील रविवारी सायंकाळी वादळात घर कोसळले व यामध्ये नानसिंग पावरा वय ३३, त्यांची पत्नी सोनुबाई पावरा वय २८, मुलगा रतीलाल पावरा वय ४ व मुलगी बाली पावरा वय २ वर्ष हे चौघे ढिगाऱ्याखाली दाबले गेले व या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता.


तर या दुर्घटनेत  शांतीलाल नानसिंग पावरा वय ६ वर्ष हा बालक बचावला आहे. तेव्हा या आदिवासी वस्तीवर चोपडा आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी बुधवारी भेट देत मयत यांच्या पश्चात असलेल्या त्यांचे वडील गुला पावरा, मुलगा शांतीताल पावरा, मयत यांची आई यांचे सांत्वन केले तसेच  मतताच्या कुटुंबासह या आदिवासी वस्तीवरील आदिवासी समाज बांधवांना अन्न धान्याचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, पिना कोळी, यदा पावारा, आंबा पाणी येथील पोलीस पाटील दिलीप बारेला, मुका बारेला, थोरपाणीचे पोलीस पाटील लक्ष्मण बारेला व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments