खंडित वीजपुरवठ्याला शेतकरी कंटाळले शेती पंपाच्या वारंवार खंडीत वीजपुरवठ्याला कंटाळून महावितरणच्या हातेड सबस्टेशनवर शेतकरी उर्वेश साळुंखेचे...
खंडित वीजपुरवठ्याला शेतकरी कंटाळले
शेती पंपाच्या वारंवार खंडीत वीजपुरवठ्याला कंटाळून महावितरणच्या हातेड सबस्टेशनवर शेतकरी उर्वेश साळुंखेचे आज झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे.
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शेती पंपाच्या वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून महावितरणच्या हातेड सबस्टेशनवर शेतकरी उर्वेश साळुंखे यांचे आज झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे. चोपडा तालुक्यात कापसाची लागवड सुरू झाली आहे. त्यामुळे शेतात पाणी भरणे आवश्यक आहे. यासाठी शेती पंपाची वीज सुरळीत असणे गरजेचे असतांनाही महावितरण याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. सारखा सारखा खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्याला शेतकरी पार त्रासले असून यामुळे कापूस बियाण्यांचे व उमगणारे कोमाचे प्रचंड नुकसान होत आहे. हातेड सबस्टेशन येथील अनवर्दे हातेड सबस्टेशनवर झोपा काढो आंदोलन ॥ पुरवठा सुरळीत होइपर्यंत आंदोलन जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही अशी भूमिका ऊर्वेश साळुंखे या आंदोलनकर्ते शेतकऱ्याने घेतली आहे. फिडर वरील वीज सुरळीतपणे चालतं नाही. कित्येक कालावधी झाला तरी कोणीही दखल घेत नाही. याविषयी संताप व्यक्त करीत उर्वेश साळुंखे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी हातेड सबस्टेशन गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी ऑफिसात झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे.
No comments