adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील धनगरवाड्यात जागेच्या किरकोळ वादातून मारहाण

  जागेच्या किरकोळ वादातून मारहाण चोपडा शहरातील धनगरवाड्यात जागेच्या वादातून मारहाण झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघां विरूद्ध गुन्हा दाखल...

 जागेच्या किरकोळ वादातून मारहाण

चोपडा शहरातील धनगरवाड्यात जागेच्या वादातून मारहाण झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघां विरूद्ध गुन्हा दाखल 


 चोपडा : प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

 चोपडा शहरातील धनगरवाड्यात जागेच्या वादातून मारहाण झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घनश्याम अरुण धनगर, ओम अरुण धनगर, कविता अरुण धनगर, तिन्ही रा. धनगरवाडा चोपडा ह्या तिन्ही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुधाकर भगवान धनगर (वय ३८) रा. चोपडा धनगरवाडा, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचे पडीत जागेचे कुंपणास वरील आरोपींनी कुलुप लावले. त्या कुलुपावर फिर्यादी यांनी त्यांचे कुलूप लावले. ह्या किरकोळ कारणावरून तिन्ही आरोपींनी एकजुटीने फिर्यादीस मारहाण करण्याच्या पूर्व तयारीनिशी

फिर्यादीच्या घरात प्रवेश करुन आरोपी घनश्याम अरुण धनगर याने त्याचे हातातील चाकूसारखे वस्तूने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन तसेच ओम याने त्याच्या हातातील चाकूसारख्या वस्तूने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन तसेच ओम याने फिर्यादीच्या तोंडावर, दाढीवर त्याचे हातातील फायटरने मारुन दुखापत केली.असुन 

चोपडा शहर पो.स्टे. CCTNS (भाग-५) गुरनं. ०२२८/२०२४ भादवी कलम ३२६,४५२,३२३,५०४,५०६,३४, प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे 



No comments