adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*हे अधिकाऱ्यांचे विचार कधी बदलणार?*

  *हे अधिकाऱ्यांचे विचार कधी बदलणार?*           राज्य उत्पादन शुल्काचे पुण्याचे अधिकारी सर्व पब व परमिट रूमवर तात्पुरती कारवाई करून मलम पट्ट...

 *हे अधिकाऱ्यांचे विचार कधी बदलणार?*

          राज्य उत्पादन शुल्काचे पुण्याचे अधिकारी सर्व पब व परमिट रूमवर तात्पुरती कारवाई करून मलम पट्टी लावत आहेत                                          अमृतभाई सचदेव

अमृतभाई सचदेव

पुण्यामध्ये दारू पिऊन एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री दोन तरुणांचा जीव घेतला त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा जागेहूऊन कामाला लागली सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क यांनीही दाबादाबी करण्याचे प्रयत्न केले आता मात्र राज्य उत्पादन शुल्काचे पुण्याचे अधिकारी सर्व पब व परमिट रूमवर तात्पुरती कारवाई करून मलम पट्टी लावत आहेत. राज्य उत्पादन शुल्क हे खात राज्याचे उत्पादन शुल्क जेवढा वाढवतात तेवढी वर कमाई दुपटीने आपली स्वतःची वाढवीत असतात हे आतापर्यंत भरपूरदा सिद्ध झालेले आहे. आजही संपूर्ण जिल्ह्यात परवाना किंवा वय मर्यादे मर्यादा न तपासता सर्रास दारू विक्री सुरू आहे पुण्याचा बोध घेऊन राज्य उत्पादन शुल्क जळगाव चे अधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कामाला लावले पाहिजे कारण जी बोंब पुण्यामध्ये तीच बोंब जळगावच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे हे सर्वांना सर्वश्रुत आहे यासंदर्भात जळगावच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा व मंत्री महोदयांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. यानंतर या अधिकाऱ्यांची मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे अशी मी व्यक्तिगत तक्रार लाच लुचपत विभाग व ईडी कडे करणार आहे. मागील दीड वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क जळगाव चे अधीक्षिका सौ सीमाताई झावरे व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची मी फोनवर व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार ज्यांच्याकडे व्यक्तिगत तक्रार केली होती त्यानंतर अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे कमिशनर यांना आदेश दिले होते आणि मुंबईपासून नाशिक पासून जळगाव पर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागली होती नंतर येथून सीमाताई झावरे यांची बुलढाण्याला बदली झाली होती आताही मला या संदर्भात उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांना साकडं घालावे लागेल असे वाटते साकडे.    *कोणी निंदा कुणी वंदा आमचा फक्त पैसे खाण्याचा धंदा!*         *हे अधिकाऱ्यांचे विचार कधी बदलणारे?*                            *अमृतभाई सचदेव जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव          संचालक जन संघर्ष  मोर्चा चोपडा*

No comments