चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ सरसकट मदत द्या. या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, हायब्रीड कांदा व आदी काही पिके ज...
चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ सरसकट मदत द्या.
या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, हायब्रीड कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाली
जळगाव जामोद: प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
जळगाव (जामोद) :- रविवार दि. २६ख मे २०२४ रोजी जळगांव जामोद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी ,नागरीकांचे अतोनात नुकसान झालेले आहे .
या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, हायब्रीड ,कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाली त्याचबरोबर छोट्या-मोठ्या व्यवसायीकांचे व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे लोकांच्या गुरा-ढोरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तसेच अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे विजेचे पोल तुटुन पडलेले आहेत काही गावांमध्ये ३ दिवसापांसुन लाईन सुद्धा नाही याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. तरी वरील बाब लक्षात घेऊन तात्काळ नुकसान ग्रस्तांना मदत देण्यात यावी हि मागणी तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या मागण्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला.
यावेळी अश्पाक देशमुख, अजय गिरी, वैभव जाणे,अनिलसिंग राजपुत, सोपान पाटील, सदाशिव जाणे, किसना दातीर, सुपेश वळोदे, अमोल बहादरे, संतोष गणगे, विष्णू पाटील, भुषण अढाव तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
No comments