चोपडा रोटरी व नर्सिंग कॉलेजची मतदान जनजागृती रॅली चोपडा रोटरी क्लब व डॉ सुरेशदादा पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने न...
चोपडा रोटरी व नर्सिंग कॉलेजची मतदान जनजागृती रॅली
प्रतिनिधी : चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सध्या देशभरात विविध टप्प्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरु असून या निवडणूकीतील मतदान टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग - विभाग व प्रत्येक जिल्हयातील जिल्हाधिकारी, शासन यंत्रणा प्रयत्न करीत आहेत तेव्हा या दृष्टिने आपल्या जळगांव जिल्ह्यातही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने मतदार जनजागृतीसाठी शासकिय विभागांसह विविध सेवाभावी संघटना, शैक्षणिक संस्था द्वारे वेगवेगळ्या उपक्रमांमधून मतदार जनजागृतीसाठी प्रयत्न होत आहेत . लोकशाहीच्या दृढिकरणासाठी या राष्ट्रीय कार्यात आपलाही सहभाग, योगदान असावे या भूमिकेतून चोपडा रोटरी क्लब व डॉ सुरेशदादा पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच मतदान जनजागृती पदयात्रा चोपडा शहरातून काढण्यात आली . या पायी रॅलीचा शुभारंभ चोपडा बस स्थानकातून न .प. चोपडाचे मुख्याधिकारी राहूल पाटील, रोटरी क्लब चोपडाचे प्रेसिडेंट चेतन टाटिया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख स्वप्निल महाजन, नर्सिंग कॉलेज प्रिंसिपल सौ.करुणा चंदनशिव, यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला .चोपडा शहरातील श्री शिवाजी चौक, डॉ .आंबेडकर पुतळा, मुख्य बाजार पेठ, तहसिल कार्यालय, गांधी चौक, स्वस्तिक टॉकिज मार्गे ग्रामिण पोलिस स्टेशन या मार्गाने निघालेल्या या पायी रॅलीचा समारोप चोपडा न .प . श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला . तेथे मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी उपस्थित नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी - विद्यार्थीनी, रोटरी सदस्य व न . प .कर्मचारी यांना मतदानाचे महत्त्व स्पष्ट करीत मतदान टक्केवारी वाढविणेसाठी येत्या ४ दिवसात मतदार जनजागृती साठी सर्वांनी आपापल्या परिसरात प्रयत्न करावेत असे आवाहन केले . या वेळी रोटे . सेवानिवृत्त मुख्या . विलास पाटील यांनी उपस्थितां कडून मतदान करणेसाठी व जन जागृतीकरीता प्रतिज्ञा म्हणवून घेतली .
या पायी रॅलीत ज्येष्ठ इंजि . विलास एस् .पाटील , माजी प्रेसिडेंट पंकज बोरोले, रोटरी ट्रेझरर पवन गुजराथी, प्रदीप पाटील, चंदूभाऊ साखरे,मनोज पाटील, विपुल छाजेड, बी एस पवार, ईश्वर सौंदांकर तसेच नर्सिंग कॉलेज विद्यार्थी -प्राध्यापक वृंद यांनी अखेरपर्यंत उपस्थिती देऊन ही मतदार जनजागृती पायी रॅली यशस्वी करणेसाठी परिश्रम घेतलेत.

No comments