adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा येथे घरफोडी:मुल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला!

  सावदा येथे घरफोडी:मुल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला! सावदा पोस्टचे प्रभारी पोलिस अधिकारी राहत असलेल्या वस्तीतच चोरी सावदा विशेष प्र...

 सावदा येथे घरफोडी:मुल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी मारला डल्ला!


सावदा पोस्टचे प्रभारी पोलिस अधिकारी राहत असलेल्या वस्तीतच चोरी

सावदा विशेष प्रतिनिधी /मुबारक तडवी 

(संपादक:हेमकांत गायकवाड)

सावदा :- येथील बसस्थानकांच्या मागील बाजूस असलेल्या सोमेश्वर नगरात प्लॉट नं.५७७/९ मधील रहिवासी धनराज रंगु पाटील हे आपल्या नातेवाईकांकडे पुणे येथे गेले असल्यांचा फायदा घेवून पोलिसांची अजिबात धास्ती न बाळगता चोरट्यांनी दि.३० एप्रिल मंगळवार रोजी पहाटे या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन थंड डोक्याने चोरी केल्याची घटना घडली आहे.

प्रथम दर्शनी चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील स्वयंपाक घरातील पीठ,डाळीचे डबे, घरातील कपाटातील कपडे, देवघरातील मुर्ती अस्ताव्यस्त केलेले दिसून आले.घरमालक हे त्याच्या पत्नीसोबत बाहेरगावी असल्याने त्याचे पुतणे व पत्रकार शामंकांत पाटील यांना याबाबत येथील रहिवासी लोकांनी माहिती दिली असता त्यानी ताबडतोब पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता पोलीसांनी घटनास्थळी येऊन घराचा पंचनामा केला.

परिणामी आज दि.१ मे रोजी सदर घटनेची फिर्याद घर मालक धनराज रंगु पाटील वय ७० रा.सोमेश्वर नगर सावदा यांनी दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं.८३/२०२४ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर घरातून ५२ हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चिप,१५ हजार रुपये किंमतीची चांदीची लक्ष्मी व गणपती मुर्ती सह चांदीचे ४ लक्ष्मी नाणे,एक स्मार्ट स्पिकर,एक पाण्याची मोटार असे एकूण ७० हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरीस गेल्या आहे.

तसेच या आधीही सोमेश्वर नगरातील बंद घरातुन अशाच प्रकारे चोरी झालेली आहे.पंरतू याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली नाही.अशा चोरीच्या घटनांमुळे नागरिक कमालीचे धास्तावले असून या चोरीचा छळा जलदगतीने लावावा.अशी नागरिकांनी रास्त मागणी केलेली आहे. 

*चोरांना पोलीसाचा धाक का राहिला नाही?*

सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोरीच्या घडलेल्या घटनातून मोजक्यांचा छळा लागला असेल.पंरतू नुसत्या सावद्यात न्यु पंजाब हॉटेल मधुन सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला,जाकीर कुरैशी यांच्या घरातून ७ लाखोंची चोरी झाली. तसेच शरद भारंबे,देवीदास तायडे,भागवत कासार,अक्रम खान या सर्वांच्या घरी झालेल्या चोऱ्या,सोनाली कोल्ड्रिंक,सह शेतकऱ्यांच्या शेतातून शेती उपयोगी मूल्यवान साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले असता आजपर्यंत या चोऱ्यांचा छळा पोलीसांनी लावला नसल्याने खाकीचा धाक चोरट्यांवर दिसून येत नाही.कारण की,सोमेश्वर नगर येथे चोरी झालेल्या घराच्या पूर्वेकडील बाजूस उप-विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांचे तर पश्चिमेकडील बाजूस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे निवासस्थान असून सुद्धा या घरातून अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे आता चोरांवर पोलीसांचे धाक राहिले नसल्याची चर्चा परिसरांत होतांना दिसत आहे.

No comments