जळगाव जिल्ह्यातील ६९९ शिक्षकांना दोन दिवसा आधीच मिळाला पगार जि.प. ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांना एका क्लिकवर पगार ई कुबेर प्रणालीत, शिक्षका...
जळगाव जिल्ह्यातील ६९९ शिक्षकांना दोन दिवसा आधीच मिळाला पगार
जि.प. ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांना एका क्लिकवर पगार ई कुबेर प्रणालीत, शिक्षकांचा सर्व डाटा जमा असल्याने शिक्षकांना पगार करण्याची प्रक्रिर सोपी झाली
जळगाव : प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जि.प शिक्षण विभागात शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जमा होतात. मात्र, ई कुबेर प्रणालीमुळे जिल्ह्यातील ६९९ जि.प. शिक्षकांचा मे महिन्याचा पगार ३० मे रोजीच सर्व शिक्षकांचा बैंक खात्यात जमा करण्यात आल्याने शिक्षण विभागाकडून शिक्षकांना सुखद धक्का दिला आहे. ६९९ जि.प. ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांना एका क्लिकवर पगार ई कुबेर प्रणालीत शिक्षकांचा सर्व डाटा जमा असल्याने शिक्षकांना पगार करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यामुळे प्राथमिक जि.प. शिक्षकांना ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्य एका क्लिकवर बँक खात्यात पगाराची रक्कम अदा करण्यात आली. यासाठी जि.प. सिईओ अंकित, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. शिक्षकांच्या पगारासाठी ६८ कोटींपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली जिल्ह्यात शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याचा १ तारखेला पगार खात्यात वर्ग केला जातो. मात्र, यावेळी प्राथमिक शिक्षण विभागातील प्रत्येक तालुका समन्वयकांच्या तत्परतेमुळे ६९९ शिक्षकांच्या पगारासाठी ६८ कोटीची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसाअगोदरच शिक्षकांना पगार मिळाल्याने शिक्षण विभागाने सुखद धक्का दिला आहे.
No comments