प्रवरा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू चार तासानंतर सापडला मृतदेह राहाता तालुक्यातील बागमळा, कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहोण्यासाठी गेले...
प्रवरा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू चार तासानंतर सापडला मृतदेह
राहाता तालुक्यातील बागमळा, कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहोण्यासाठी गेलेला मुलगा बुडाल्याची घटना
राहाता : प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी १२ वाजेदरम्यान घडली. अविनाश पाराजी जोगदंड (वय १६, रा. भगवतीपूर, ता. राहाता) असे मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश जोगदंड हा त्याच्या तीन मित्रांसोबत गुरुवारी दुपारी प्रवरा नदी पात्रात पोहोण्यासाठी गेला होता. दरम्यान अविनाश हा नदीत बुडाला. त्यानंतर मित्रांनी आरडा ओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीतील अधिकारी शंकर मिसाळ यांना राहाता तालुक्यातील बागमळा, कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहोण्यासाठी गेलेला मुलगा बुडाल्याची माहिती दिली. मिसाळ यांनी राहाता नगरपरिषदेला ही माहिती दिली. त्यानंतर राहाता नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील अधिकारी अशोक साठे, शिडों नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी विलास लासुरे, राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील अधिकारी राजेंद्र पवार, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी हेमंत कार्ले हे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. नदी पात्रात त्यांनी बुडालेल्या मुलाचा शोध सुरु केला. तब्बल ४ तासानंतर अविनाश जोगदंड या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात या पथकाला यश आले. त्यानंतर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला.
No comments