adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युती आणि आघाडीवर एकटा गडी पडणार भारी ?

युती आणि आघाडीवर एकटा गडी पडणार भारी ? सांगली लोकसभा मतदार संघात ही लढत सुरू असून युती आणि आघाडीवर एकटा गडी भारी पडला आहे नेशन महाराष्ट्र न्...

युती आणि आघाडीवर एकटा गडी पडणार भारी ?

सांगली लोकसभा मतदार संघात ही लढत सुरू असून युती आणि आघाडीवर एकटा गडी भारी पडला आहे


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो

(संपादक: हेमकांत गायकवाड)

 पश्चिम महाराष्ट्रातील  सांगली लोकसभा मतदार संघातील  एक अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडतांना दिसत आहे. मोठ्या विजयी आघाडीकडे वाटचाल करताना दिसत आहे. विशाल पाटील असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. सांगली लोकसभा मतदार संघात ही लढत सुरू असून युती आणि आघाडीवर  एकटा गडी भारी पडला आहे. सांगली मतदार संघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर महायुतीकडून संजयकाका पाटील उभे होते. मात्र य दोघांना विशाल पाटील यांनी पिछाडीवर टाकलं आहे. सांगली लोकसभा १७ व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ८३ हजार ७७४ मतांनी आघाडीवर आहेत. विशाल पाटील - ४४३७७९ मते तर संजय काका पाटील यांना ३५९९५५ मते मिळाली आहेत.दरम्यान, सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून विशाल पाटील यांना तिकीट मिळालं नाही. कारण ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहत आपली ताकद दाखवून दिली. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.

No comments