adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली

रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली  दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळव...

रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली 

दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला.


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो: जळगाव प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 रावेर लोकसभा मतदार संघातून  भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला. त्यामुळे रावेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. रक्षा खडसे यांचा मतदार संघात दांडगा संपर्क तसेच त्यांनी केलेली कामे या बळावर पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. यानंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे एकदम वातावरण बदलले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची सहानुभूती त्यांच्या मागे होती. रक्षा खडसे यांनी भाजपची ईमानदारपणे दिलेली साथ यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील उभे होते. या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. रावेरमधून कोण बाजी मारहाण याकडे लक्ष लागले होते. अखेर रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. १९ व्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण ५ लाख २४ हजार ४८० मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना ३ लाख १२ हजार ४१८ मते मिळाली. त्यानुसार रक्षा खडसेंनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे.

No comments