१९ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग सावदा पोलिसांत गुन्हा दाखल विनयभंग केल्याची संतापजनक घटना नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- सावदा प्रति...
१९ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग
सावदा पोलिसांत गुन्हा दाखल
विनयभंग केल्याची संतापजनक घटना
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी.
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सावदा तालुका रावेर येथील शहरात एका भागातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा घरात कोणी नसतांना हात पकडून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोमवारी सकाळी ११ विजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीसांनी मंगळवारी दुपारी १:३० वाजता सावदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की सावदा गावातील १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह राहते सोमवारी २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून गावातील रहिवासी शकील शब्बीर मोहम्मद वय-३८ हा तिच्या घरात घुसला व तिला हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने तिचे नातेवाईकांना सांगितली. त्या घटने संदर्भात पिडीत तरुणीसह नातेवाईक यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यानुसार पीडित तरुणीच्या दिलेल्या फिर्यादीवरून शकील शब्बीर मोहम्मद याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे
No comments