चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची प...
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा
तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची पोत व कानातिल रिंग असा ६०हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल
जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील नेशन महाराष्ट्र ब्युरो
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामीण पोलिस स्टेशनला मुजाहिद जमशेद मोलाना रा..पिपरखेळ ह.मु.तरवाडे ता.चाळीसगाव यानी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची पोत व कानातिल रिंग असा ६०हजाराचा चोरीला गेल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली होती.त्याआधारे पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपिय शाहरुख शेख लाल रा.तरवाडे ता. चाळीसगाव यास मुद्यमालासह अवघ्या पाच दिवसांत तपासाचा छडा लावुन अटक केली हि कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी चाळीसगाव परिमंडळाच्या अप्परपोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव भागाचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दाते, पोलिस उपनिरीक्षक कुणाला चव्हाण,हेड कॉन्स्टेबल जयेश पवार, युवराज नाईक, संदिप पाटील, शांताराम पवार, विजय शिंदे, सुनील पाटील,व पुढील वर्षी तपास स.पो.नि.प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश पवार करीत आहेत

No comments