adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड राखला

  भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी  भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड रा...

 भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी 


भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड राखला

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो: जळगाव प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)

जळगाव लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड राखला आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना ४ लाख ८३ हजार ७४८ मतं मिळाली आहेत. तर, महाविकास आघाडीच्या करण पवार यांना २ लाख ९५ हजार ७८२ मतं मिळाली‌. जळगावमध्ये एकूण ११ लाख ६५ हजार ९६८ मतदान झालं होतं. यातील १० लाख २९ हजार ७१७ मतमोजणी झाली आहे. तर, निकाल हाती येईल पर्यंत १ लाख ३६ हजार २५१ इतकी मतमोजणी बाकी  होती  जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्रही समोर आलं आहे. भाजपने आपला गड राखला आहे.  खासदार उन्मेष पाटील यांचं बंड - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं होतं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. मात्र, तरीही भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे

No comments