adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथिल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी मुख्यमंत्रीसह विभागात तहसीलदार यांचे द्वारे सादर केले निवेदन

चोपडा येथिल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी मुख्यमंत्रीसह विभागात तहसीलदार यांचे द्वारे सादर केले निवेदन शालेय शिक्षण विभागातही सादर क...

चोपडा येथिल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी मुख्यमंत्रीसह विभागात तहसीलदार यांचे द्वारे सादर केले निवेदन शालेय शिक्षण विभागातही सादर केले निवेदन 



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो चोपडा प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा येथिल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.यांचे कडून नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,मुख्य सचिव,शालेय शिक्षण विभाग सचिव,व राहुल रेखाराव,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,यांना चोपडा तहसीलदार यांचे द्वारे निवेदन देण्यात आले.असून या निवेदनात राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसु‌द्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत..चे निवेदन देण्यात आले. 
 याबाबत अधिक माहिती अशी की  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसु‌द्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार त्यांनी खालीलप्रमाणे हरकती या पत्राद्वारे नोंदविल्या आहेत.१) इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्‌गगीता,मनाचे श्लोक आणि मनुस्मृति यांच्या विषमतावादी विचारांचा,धोरणांचा समावेश करणे या बाबी भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार कलम १३,१४,१७,१९,२१,२८ नुसार बेकायदेशीर व असंविधानिक असल्यामुळे त्या विरोधात तीव्र हरकती नोंदविण्यात येत आहे.२) आपल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक,भगवद्‌ गीता आणि मनुस्मृतीच्या काही अंशाचा समावेश करणे आक्षेपार्ह असून,धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतातील सर्व नागरिकांस समान असलेल्या समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेला बाब आहे.३)काळीमा फासणारी  तसेच सर्जनशील भारताची निर्मिती करणाऱ्या शिक्षण प्रणालीमध्ये अशा प्रकारच्या समता मुलक समाज़ निर्मितीच्या संविधानाच्या प्रशिक्षण इत्यादी शून्यवत ठरविले आहेत.असे असताना उपरोक्त बाबी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे देशातील युवा वर्गाला अधोगतीच्या विषमतेच्या दिशेने पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते आहे वरील पार्श्र्वभूमीवर प्रस्तावित मसुद्यामध्ये मनाचे श्लोक,भगवद्‌ गिता आणि मनुस्मृतीच्या काही अंशांचा समावेश करणे भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार १३,१४,१७,१९,२१,२८ नुसार बेकायदेशीर व असंविधानिक असल्यामुळे त्या बाबी रद्द कराव्यात आणि संविधानाची प्रास्ताविका, अनुछेद १३ ते ३२ पर्यंतचे मूलभूत अधिकार आणि भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्यै या मूल्यांचा समावेश करावे की ज्यामुळे भारतीय नागरिक आपल्या हक्क आणि अधिकारासंबंधी आणि कर्तव्या संबंधी जागृत होतील. तेच देश हितकारक आहे.वरीलप्रमाणे दुरुस्ती न झाल्यास दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/समता सैनिक दल आणि संविधान समर्थक समाज,विविध संघटनांच्यावतीने महाराष्ट्रभरामध्ये तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील आणि उग्र आंदोलन छेडण्यात येतील त्याची संपुर्ण जबाबदारी आपली असेल,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य.आंबेडकर (ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष) व डॉ.हरीष रावलिया (ट्रस्टी चेअरमन),अँड.सुभाष जौंजाळे (रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन) यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ दयावी.अश्या आशयाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.सदरील पत्रकावर असंख्य कार्यकर्तेच्या सह्या केल्या आहेत





No comments