मारुती मंदिर ट्रस्ट च्या मार्फत निवृत्ती व दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कार गलंगी तालुका चोपडा दि 3/6/2024 मारुती मंदिर ट्रस्ट ...
मारुती मंदिर ट्रस्ट च्या मार्फत निवृत्ती व दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कार
गलंगी तालुका चोपडा दि 3/6/2024 मारुती मंदिर ट्रस्ट च्या मार्फत निवृत्ती व दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कार
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो: चोपडा
( संपादक : हेमकांत गायकवाड )
गलंगी तालुका चोपडा गलंगी येथील मारुती मंदिर ट्रस्ट च्या संयुक्त संकल्पनेतून दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावा या येथूने कार्यक्रम राबवण्यात येत आहे
यावर्षीही तसेच पद्धतीने सेवानिवृत्त झालेले वाहक व शिक्षक यांच्या शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक सोमनाथ खंडू देवराज व वाहक बाबुराव आत्माराम देवराज यांच्या सह पत्नी सत्कार करण्यात आला व मारुती मंदिर साठी जागा दिलेले असे दानवीर रतिलाल आनंदा बाविस्कर यांच्या ही सहपत्नीक सत्कार उपसरपंच रंगराव देवराज मारुती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष छगन देवराज व सरपंच शितल देवराज यांनी केला तसेच बी एस डब्ल्यू ऑल क्लिअर पास झाल्यामुळे तेजस रायसिंग यांच्या सत्कार विजय देवराज उपायुक्त जल संधारण विभाग यांनी केला व दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या यांच्या सत्कार वह्या पेन व शालेय उपयुक्त साहित्य पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पुढील वर्षी अजून मनोबल वाढावे या येथूने त्यांच्या सत्कार ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केला यावेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच रंगराव देवराज व मारुती ट्रस्टचे अध्यक्ष छगन देवराज सरपंच शितल देवराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण देवराज ग्रामपंचायत सदस्य विश्वास रायसिंग गोपाल देवराज पोलीस पाटील चारुलता देवराज प्रकाश सपकाळे माझी स्टेट बँक मॅनेजर माधवराव देवराज माजी कृषी अधिकारी विजय मगन देवराज उपयुक्त व गावातील ज्येष्ठ नागरिक मारुती मंदिर चे सर्व ट्रस्ट सदस्य ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन योगेश देवराज यांनी केले तर आभार मारुती मंडळ ट्रस्ट यांनी मानले


No comments