adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

          !!    YouTube Video  !!                 ह्या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी              ☝ वरती क्लिक करा  व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी ...

          !!   YouTube Video !!
           
    ह्या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 
            ☝वरती क्लिक करा 
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी YouTube  नावावर क्लिक करा 

 अंतुर्ली येथे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए. भोईसर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो: किरण पाटील मुक्ताईनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे समस्त वंजारी समाज ,वंजारी युवा संघटना अंतुर्ली व गावकरी मंडळी यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. 


यावेळी अंतुर्ली येथे जेडीसीसी बँक समोर मंडप टाकून प्रतिमा प्रस्थापित करण्यात आली.यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या वंजारी समाज बांधव, महिला, प्रतिष्ठित नागरिक ,ग्रामस्थ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए. भोईसर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.एस.ए. भोईसर म्हणाले की, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना अंतुर्ली येथे हेलिकॉप्टरने आले होते त्यांनी जे भाषण केले त्याला जोड नाही, त्यांनी सत्ताधारी असतानाही विरोधकांच्या बद्दल अत्यंत आदराने शब्द उच्चारले ,मुंडे साहेबांनी विचार केला हा जो वंजारी समाज हा दारोदार भटकतो आहे त्यांना भाकरी नीट मिळत नाही त्यांच्या मुलांनी मुलींनी शिका व त्यांच्याकरता सरकारमध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांनी एक कायदा केला, गोपीनाथ मुंडे यांनी जीवनामध्ये सात्विकता ठेवली ,नव्या पिढीने जसं गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र मध्ये नवी छाप पाडली आणि सात्विक विचार ठेवले तसे आपण पण ठेवा .जसं गोपीनाथ मुंडे यांनी काम केलं तसं आपण सुद्धा करा अंतुर्ली गावचे कार्यकर्ते जे आहे त्यांना मी सांगेल की ,गावच्या गरजा आणि समस्या एकत्र बसून सोडूया जसं गोपीनाथ मुंडे यांनी सर्वांसाठी केलं तसा आपणही करूया असे यावेळी असे एस.ए.भोईसर यांनी सांगितले .याप्रसंगी वंजारी समाज बांधव ,महिला ,गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंजारी युवा संघटना अंतुर्लीचे अध्यक्ष वैभव पालवे व उपाध्यक्ष संदीप पालवे व समस्त वंजारी समाज बांधव यांनी प्रयत्न केले.









No comments