adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार; राज्य सरकारचा निर्णय

 घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार; राज्य सरकारचा निर्णय घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या व...

 घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार; राज्य सरकारचा निर्णय


घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील. 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई वृत्तसेवा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

राज्य सरकारकडून घरोघरी 'स्मार्ट मीटर'लावण्यात येणार अशी योजना आखण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याविरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील. अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे

No comments