विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी बसचा मासिक पास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला ...
विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी बसचा मासिक पास
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिले आदेश
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- मुंबई
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
दि.१५ जून पासून नियमितपणे शाळा - महाविद्यालय हि सुरू झाली असून विद्यार्थ्यांना एसटी बसच्या पासेस साठी रांगेत उभे राहावे लागत होते पण ह्या वर्षी मात्र शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आपल्या घरापासून शाळा- महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेमध्येच एसटीचे मासिक पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी तसे आदेश एसटी प्रशासनाला दिले आहेत. शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रवास भाड्यात ६६ टक्के एवढी सवलत दिली आहे. याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यांना केवळ ३३ टक्के रक्कम भरून एसटीचा मासिक पास काढता येतो. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनिंना एसटीचा पास मोफत दिला जातो. यापूर्वी विद्यार्थ्यांना जवळच्या एसटी आगारात जाऊन रांगा लावून पास काढावा लागत होता. यापुढे शाळा-महाविद्यालयांनी पुरविलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेतच विद्यार्थ्यांना पास वितरित केले जाणार आहेत. १८ जून पासून ही योजना राबविण्यात येणार आहे.

No comments