स्वामीनारायण मंदिर सावदाचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन. शास्त्री भक्तीकिशोरदास कोठारी यांच्या अचानक निधनान...
स्वामीनारायण मंदिर सावदाचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन.
शास्त्री भक्तीकिशोरदास कोठारी यांच्या अचानक निधनाने सावदा व परिसर तसेच विविध ठिकाणी असलेले त्यांचे भक्त शोकसागरात बुडाले
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- सावदा मुबारक तडवी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावद्यातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी वय ४५ वर्ष यांचे शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ७ वा एका कथेच्या कार्यक्रमात खाजगी वाहनाने जात असतांना त्यांना त्रास जाणवू लागला असता त्यांना तातडीने भुसावळ येथील खाजगी रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली
शास्त्री भक्तीकिशोरदास हे सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी तसेच स्वामीनारायण गुरुकुलचे मा. उपाध्यक्ष होते. त्यांनी वेदांतव्याकरण या विषयावत संस्कृत या विषतात दुय्यम पी. एच. डी केली होती.
शास्त्री भक्तीकिशोरदास जी भागवत कथाकार देखील होते. त्यांनी सावदा सह परिसरात द्वारका, हरिद्वार, काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते, त्याचे कथा कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी उपस्थित असायची. त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य अविरत या भागात केले.
हिंदू धर्माचे प्रचार तसेच सर्व धर्माचे सर्वधर्मसमभाव समरसते मध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता, त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, त्यानी स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते, त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे दि २९ रोजी संत परंपरे नुसार विधिवत समाधी देण्यात येणार आहे शास्त्री भक्तीकिशोरदास कोठारी यांच्या अचानक निधनाने सावदा व परिसर तसेच विविध ठिकाणी असलेले त्यांचे भक्त शोकसागरात बुडाले आहे.
No comments