Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रेड क्रॉस ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील

  रेड क्रॉस ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील  जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागात रेड क्रॉस सोसायटी...

 रेड क्रॉस ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील 


जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागात रेड क्रॉस सोसायटी आरोग्यविषयक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.

शौकतभाई शेख / श्रीरामपूर नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

जागतिक स्थरावर रेड क्रॉस सोसायटी मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.नागरिकांचे आरोग्य सुलभ व निरोगी ठेवण्यासाठी जगातील रेड क्रॉस स्वयंसेवक समर्पित वृत्तीने कार्य करत आहेत. श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटी तर्फे दरवर्षी जाणाऱ्या आषाढी दिंडीतील वारकरी बंधू - भगिनींना आरोग्य सुविधा देणार असून जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागात रेड क्रॉस सोसायटी आरोग्यविषयक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.

        जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रांताधिकारी किरण सावंत यांचे शुभ हस्ते झाला त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

        सचिव सुनील साळवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.


      निबंध स्पर्धा  प्रथम..कु.श्रुतिका गणेश निद्रे,द्वितीय कु.कार्तिकी सचिन चंदन,तृतीय कु. दिपाली तानाजी पाटील


घोषवाक्य स्पर्धा

प्रथम..कु.वैष्णवी केदार, द्वितीय. ओमकार गणेश पवार, तृतीय - हितेन चंद्रशेखर गायकवाड,


रांगोळी स्पर्धा

रांगोळी स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट रांगोळी कु. सृष्टी किरण सोनवणे आदींना सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र, व रोख रक्कम देवून अध्यक्ष प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

           आभार प्रवीण साळवे यांनी तर सूत्रसंचालन निर्मला लांडगे यांनी केले

        कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,उपाध्यक्ष तहसीलदार मिलिंद वाघ, सचिव सुनील साळवे, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके,श्रावण भोसले,सुरेश वाघुले,सचिन चंदन,गोरक्षनाथ बनकर, सुखदेव शेरे,विश्वास भोसले, अवधूत कुलकर्णी,संजय दुषींग,विनोद हिंगनिकर,माया चाबुकस्वार,पुष्पा शिंदे, निर्मला लांडगे,किमया चंदन आदींनी परिश्रम घेतले.

वृत्तविशेष सहयोग

पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर,

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111

No comments