Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्या बाबतीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन

चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्या बाबतीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन चोपडा तालू...

चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्या बाबतीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन


चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्या बाबतीत आज चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले                 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- लासूर ता‌.चोपडा (वार्ताहर) 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्या बाबतीत आज  चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले                  आखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करुन धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणीं ची सोडवणूक करण्याबाबत आज दि २७/६/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात स्वस्त धान्य दुकानदार यांना आजचा महागाई निर्देशांकानुसार कीमान १०० रूपये प्रति क्विंटल वाढ करावी,धान्याचा गोणी कमी भरत असून ते वजन पुर्ण ५० कीलो मिळावे, प्रत्येक लाभार्थ्यांची ई के वाय सी व मोबाईल सिडींग करण्यासाठी वेळेचे बंधन नसावे व हि प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी व हे सिडींगचे प्रती सदस्य ५० रुपये शुल्क लाभार्थ्यांकडून वसूल करणेसाठी परवानगी मिळावी, रास्त भाव दूकानदारांना प्रलंबित मार्जिन मिळावे व यापुढे दर महिन्याला पाच तारखेपर्यंत नियमित मिळावे तसेच  अशा विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या सह सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत यावेळी मधूकर राजपूत , दिलीप पालीवाल,ए‌.डी.कोळी, कांतीलाल चौधरी,संजय पाटील प्रविण पाटील,रुपेश कोष्टी ,राजू तडवी, सरफराज तडवी योगेश बाविस्कर तसेच महिला बचत गटाच्या सौ.मिनाबाई कोळी,सौ‌.मायाबाई महाजन यांच्या सह स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

No comments