सावद्यातून मध्यरात्री जातात अवैधरित्या निर्भयतेने म्हशींची वाहतूक करणारे ट्रक ? परवाना नसताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक! नेशन महाराष्ट्र...
सावद्यातून मध्यरात्री जातात अवैधरित्या निर्भयतेने म्हशींची वाहतूक करणारे ट्रक ?
परवाना नसताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक!
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सध्या परप्रांतातून निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून काही एक प्राणी वाहतूकीचा परवाना नसताना अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक दिवसाआड घाटातून पाल, खिरोदा, रोझोदा, कोचूर या चोरट्या मार्गाने तर काही ट्रक बुर्हानपूर कडून रावेर मार्गाने थेट महाराष्ट्र राज्यात राजरोसपणे प्रवेश करून सावदा येथे येऊन, येथून यातील काही ट्रक फैजपूर कडे तर काही सावदा शहरातील मुख्य हम रस्त्यावरून बेधडकपणे सावदा रेल्वे स्टेशन या मार्गाने हतनूर धरणाकडे जात असतात. यात विशेष असे की, याच रस्त्यावर सावदा पोलिस स्टेशन देखील आहे. तरीही सदरं ट्रक पोलीस स्टेशन समोरुन पास होतात च कसे? असे बोलले जात आहे. तरी गेल्या दिड वर्षात फक्त नागरिकांच्या सतर्कतेमुळे सावदा हद्दीत अशा प्रकारे मुक्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रकांपैकी एक ते दोन ट्रक पकडले गेले असेल. परंतु स्वतः सावदा पोलिसांकडून सदरील कालखंडात याबाबत अशी एकही कारवाई अद्यापही झाल्याची घटना समोर आल्याचे दिसून आले नाही? अशा अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकांशी १२०० ते १५०० रुपये प्रमाणे प्रती ट्रक ची वसुली करुन पुढील प्रवासासाठी मोकळे सोडले जाते. म्हणून सदरील एक वेळ बदलून या मार्गाने जाण्याला प्रथम प्राधान्य देतात. या ट्रकांची पैशांची वसूली करणारे पोलिस कर्मचारी व निर्दयीपणे जरावरांची वाहतूक अशा प्रकारे तस्करी करणार्यांन मध्ये थेट भ्रमनध्वनीवरचा कनेक्शन देखील आहे इथपर्यंतची चर्चा शहरात होत असते?.
अनेक वर्ष झाले बदली झालेली असली तरी अवैध धंदे वाल्यांचे हप्त्याची माया जमविणार कलेक्शन अवैध धंदेवाईकांकडून हप्ते गोळा करणारे एक पोलीस कर्मचारी सावदा पोलीस ठाण्यात ठाण मांडूनच आहे
गेल्या ११ वर्षात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची सावदा पोलिस ठाण्यातून बदली झाली.मात्र सतत सन २०१३ पासून आजही सावदा पोलिस ठाण्यात हे पोलीस दादा कार्यरतच आहेत. परंतु आपापल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे चालकांकडून हप्ते गोळा करणाक कारे असे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना काही वर्षांपूर्वी ज्यावेळी तात्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जळगांव जिल्हा पोलिस मुख्यालयात जमा करून घेतले होते. त्या वेळी त्या बदल्यांमध्ये बदली होवूनही की काय? मात्र आजही सावदा पोलिस ठाण्यात असलेल्या सदरील पोलीस दादांचा समावेश होता, असेही बोलले जात आहे. तरी सदर प्रकाराची मागील पार्श्वभूमीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आता तरी लक्ष देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
No comments