दिशादर्शक फलकाच्या अडीच कोटी रुपयाला लावला चुना अद्याप पर्यंत अधिकाऱ्यांवर नाही दाखल झाला गुन्हा फाईल चित्र नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो ...
दिशादर्शक फलकाच्या अडीच कोटी रुपयाला लावला चुना अद्याप पर्यंत अधिकाऱ्यांवर नाही दाखल झाला गुन्हा
![]() |
फाईल चित्र |
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय च्या वतीने रस्त्यांवर लावलेल्या दिशादर्शक फलकासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यासाठी जवळपास प्रत्येकी एक कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले होते परंतु चोपडा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री गणेश उखर्डू पाटील व यावल उपविभागातील उपविभागीय अधिकारी तडवी सहित सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता मिळून सदर कामे फक्त कागदावरच केली आहेत अशी चर्चा सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव कार्यालयात दबक्या आवाजात सुरू आहे दोघही उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित ठेकेदार श्री सारडा याला दडपशाही व दादागिरीने हॉटेल रॉयल पॅलेस जवळ असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात आपले पैसे घेऊन केवळ कागदावरच दिशादर्शक फलक दाखवलेले आहेत रस्त्याने चालणारी वाहने पादचारी सर्व प्रवाशांसाठी ठीक ठिकाणी मार्गदर्शक अशा खुणा असतात उदाहरणार्थ रस्त्यावर असलेली वळणे रस्त्यावरील नदी नाले पूल अरुंद रस्ते धोकेदायक सूचना सर्विस रस्ते जोड रस्ते ठिकठिकाणी लागणारे थांबे रस्त्यावरील गतिरोधक शाळा अशा विविध मार्गदर्शक खुणा चोपडा उपविभागाअंतर्गत व यावल उपविभागा अंतर्गत असलेल्या रस्त्यांवर कुठेही लावलेल्या नाहीत सदर कामासाठी शासनाकडून दोघं उपयोगासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु चोपड्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी गणेश पाटील यांनी सदर कामास ठेंगा दाखवून स्वतःच्या खिसा भरला महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन आदेश एल टी एस २०२१ प्रक्र २२२सेवा दोन मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ३२ दिनांक १५ डिसेंबर २०२१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर येथे रस्त्याच्या कामात झालेल्या अनियमित ते बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने श्री इमरान बुरान शेख उपअभियंता सावदा व गणेश उखर्डू पाटील उप अभियंता यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती सदर पार्श्वभूमी विचारात घेऊन महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमयन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४ कलम दोन कलम चार पाच मधील तरतुदीनुसार क्षम प्राधिकार्याच्या मान्यतेने दोषी उपअभियंता इमरान बुरान शेख व उपअभियंता गणेश उखर्डू पाटील यांची बदली अनुक्रमे चिपळूण व रत्नागिरी येथे झाली होती परंतु दोघेही अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत यावरून सदर अधिकाऱ्यांची दबंग गिरी दिसून येते व त्याच वर्षी श्री गणेश उखर्डू पाटील उपअभियंता उपविभाग चोपडा यांना निर्लज्जपणाच्या कळस गाठून शासनाने महाराष्ट्र शासन उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित केले व दुसऱ्याच्या वर्षी यावल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी जे एस तडवी यांना देखील शासनाने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित केले कारण हे दोघही अधिकारी अधीक्षक अभियंता पीपी सोनवणे यांचे खास हस्तक मानले जातात अधीक्षक अभियंत्याच्या आशीर्वादाने संबंधित अधिकारी केवळ कागदावर कामे दाखवून कंत्राटदारांना धाक दडपशाही दाखवून सारा मलिदा लाटताना दिसतात शासनाच्या दिशादर्शक फलक या कामासाठी आलेला अडीच कोटी रुपयांच्या निधी ला संबंधित अधिकाऱ्यांनी चुना लावलेला असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही
![]() |
जयराम कोळी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार |
No comments