नेशन महाराष्ट्र न्यूज पोर्टलच्या बातमीची घेतली दखल अखेर तो खड्डा बुजविण्यात आला बुजविण्यात आलेला खड्डा चोपडा शहरातील ग्रामस्थांसह रहिवास...
नेशन महाराष्ट्र न्यूज पोर्टलच्या बातमीची घेतली दखल अखेर तो खड्डा बुजविण्यात आला
![]() |
| बुजविण्यात आलेला खड्डा |
चोपडा शहरातील ग्रामस्थांसह रहिवासींनी मानले आभार
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
काही दिवसांपूर्वी नेशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या न्यूज पोर्टलवर चोपडा शहरातील भोकर वाडा पोलीस चौकी ते रामपूराकडे जाणारा रस्ता हा कायमस्वरूपी वर्दळीच्या रहदारीचा असुन सदर रस्त्याने पादचारी, सायकल, मोटरसायकल, रिक्षा, प्याजो रिक्षा, बैलगाडीने रात्रपाळी लाईट असल्याने त्या भागातील शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातात व मोठे अवजड वाहतूक करणारे वाहन या रस्त्याने रात्रबेरात्री व दिवसा देखील वाहतूक सुरू असते हा रस्ता गावाबाहेर जाण्याचा मुख्य रस्ता असुन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्याला दुरुस्त न करण्यात आले तर मोठी जीवित हानी होऊ शकते आणि होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण असणार असा सवाल देखील जनतेने उपस्थित होत आहे अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिकेद्वारे तो खड्डा त्वरित बुजविण्यात आला असून तेथील पादचारी, ग्रामस्थ व वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे याप्रसंगी रहिवासीसह नागरिकांनी नेशन महाराष्ट्र न्यूज पोर्टल व टीमचे आभार मानले आहेत


No comments