adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नुकसानग्रस्त संभ्रमात-वंदना डिक्कर.

  प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नुकसानग्रस्त संभ्रमात-वंदना डिक्कर. वादळीवाऱ्यासह झालेल्या नुकसानग्रस्तांच्या नुकसानीची वंदना डिक्कर यां...

 प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नुकसानग्रस्त संभ्रमात-वंदना डिक्कर.


वादळीवाऱ्यासह झालेल्या नुकसानग्रस्तांच्या नुकसानीची वंदना डिक्कर यांचे कडून पाहणी

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- अमोल बावस्कार मलकापूर.बुलढाणा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

बुलढाणा :- जळगाव/तालुक्यातील हिंगणा ( मानकर ) परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळणे अपेक्षित आहे.पंरतु दोन दिवस उलटुनही अधिकारी गावात फिरकलेच नाहीत. सर्वच अधिकारी हप्ते वसुलीत मग्न आहेत कि काय.अशा प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गावातील नुकसानग्रस्त संभ्रमात अवस्थेत असल्याची खंत सौ वंदना प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केली. दि.१२ जुन रोजी दुपारी हिंगणा ( मानकर ) परिसरातील अनेक गावांमध्ये  वादळीवाऱ्यासह झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी वंदना डिक्कर यांनी हिंगणा येथे घरावरील टिनपत्रे उडुन गेलेत.पावसाने घरातील धान्य खराब झाले यासर्व नुकसानीची पाहणी केली. यापूर्वी जळगाव तालुक्यात वेळोवेळी होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीने सर्व जणता भयभीत झाली आहे. प्रशासनाच्या थातुरमातुर तोंडपाहुन केलेले पंचनामे नुकसानग्रस्तांना मारक ठरले आहेत. आणि प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील लोकांना बोगस लाभ दिल्याने खरे नुकसानग्रस्त मात्र मदतीपासून वंचित ठेवले याचा लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटना हिशोब चुकता करेल असा सज्जड दम वंदना डिक्कर यांनी यावेळी बोलतांना दिला.


नुकसानग्रस्तांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी. यामधे दिरंगाई झाल्यास नुकसानग्रस्तांचा होणारा उद्रेक सरकारला महागात पडेल असल्याचा इशारा देण्यात आला.

No comments