वेढोदे येथील सात महिन्याची मुलीला ठाणे येथील फोर्टीज हॉस्पिटल ला मोफत ओपन हार्ट सर्जरी योगायोग गलंगी येथे एका चॊकात पुण्यनगरीचे वार्ताहर ...
वेढोदे येथील सात महिन्याची मुलीला ठाणे येथील फोर्टीज हॉस्पिटल ला मोफत ओपन हार्ट सर्जरी
योगायोग गलंगी येथे एका चॊकात पुण्यनगरीचे वार्ताहर मच्छिंद्र रायशिंग यांच्याशी भेट झाली. आणि तात्काळ आदिवासी सामाजिक कार्यकर्ता व उपसरपंच प्रमोद बारेला यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वेढोदे गावातील अत्यन्त गरीब कुटुंबातील वसंत पाटील यांचा सात महिन्याचा बाळाला हृदयला दहा एम.एम. चे दोन आणि सात एम.एम. चे एक असे तीन छिद्र अतिशय गंभीर आजार शी झुंजत होते. आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्याने खाजगी रुग्णलयात दिड ते दोन लाख रुपये खर्च झालें होता.हताश झालेला बापची योगायोग गलंगी येथे एका चॊकात पुण्यनगरीचे वार्ताहर मच्छिंद्र रायशिंग यांच्याशी भेट झाली. आणि तात्काळ आदिवासी सामाजिक कार्यकर्ता व उपसरपंच प्रमोद बारेला यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला.तरी रुग्णाचे रिपोर्ट बघुन योजनेसाठी लागणारे कागदोपत्री प्रमोद बारेला हे दोन दिवसात तयार करत यांचा साह्याने ठाणे येथील खाजगी हॉस्पिटल फोर्टिज ला शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आले.तसेच ते लहान बाळ व परिवारात आज सुखरूप आंनदी आहे.
. असेच प्रमोद बारेला हे आता पर्यंत हृदयाचे चार मुलाचे मोफत सहकार्य करण्यास मदत केलेले आहेत. तरी असले आजार ग्रस्त गरीब कुटुंबाला आव्हान करीत आहे की, कोणाच्या बडी न पडता आमच्याशी संपर्क साधा आणि चांगल्या खाजगी रुग्णालयात मोफत ऑपरेशन करून मिळेल.
No comments