विद्यार्थ्यांच्या गणवेशाबदल व मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल उर्वेश साळुंखे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.....! जिल्हा परिषदेच्या ...
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबदल व मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल उर्वेश साळुंखे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.....!
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कापड काय गुजरातहून येत आहे का? मुलींना मोफत शिक्षणाच काय?
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य सरकारकारने जाहीर केले होते की, विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातील परंतु शाळा चालू झाल्या असून अजून पर्यंत शाळेपर्यंत गणवेशाबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाहीये. व मुलींना मोफत शिक्षण देऊ एक जून पासून असं सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितलं होतं परंतु १५ जून आली असून शाळा चालू झाले आहे परंतु अजून देखील राज्य सरकारने कुठलाही तशा पद्धतीच्या जीआर काढलेला नाहीये. राज्य सरकार जनतेला वेडे बनवत आहे. असा गंभीर आरोप जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत अंदाजीत ४८ लाख विद्यार्थी आहे. हे सर्व सर्वसामान्य कुटुंबातील व शेतकऱ्यांचे मुलं आहेत .व शाळा चालू झाल्या असून तरीदेखील विद्यार्थ्यांना अजून पर्यंत गणेशा बद्दल कुठलीही माहिती नाहीये. माझा असा राज्य सरकारला प्रश्न आहे ? हा कापड गुजरातहून येत आहे का! यामुळे विद्यार्थ्याचे गणवेश लेट होत आहे का? याची दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसात गणवेश किंवा गणवेशाचे कापड वाटप केले पाहिजे. नाहितर विधान भवनाच्या बाहेर येत्या अधिवेशनाला आंदोलन करेल असे उर्वेश साळुंखे म्हणाले.
उर्वेश साळुंखे, बुधगाव
ता. चोपडा जिल्हा. जळगाव

No comments