जिल्हाध्यक्ष, कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना अभिवादन स्वर्गीय हरिभाऊनी चोपडा तालुक्यासाठी केलेल्या विकासाच्या कामाना क...
जिल्हाध्यक्ष, कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना अभिवादन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:-माजी खा./आ. तथा जिल्हाध्यक्ष कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टी चोपडा येथील कार्यकर्त्यांनी श्रद्धेय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. व स्वर्गीय हरिभाऊनी चोपडा तालुक्यासाठी केलेल्या विकासाच्या कामाना कार्यकर्त्यांनी यावेळी उजाळा दिला. तसेच चोपडा शहरातील कार्यकर्ते विलास लोहार यांना MIDC चोपडा येथे व्यवयासाठी स्वतःचे दुकानं त्याठिकाणी व्हावे यासाठी भाऊंनी मदत केली त्यामुळे आज त्यांना भाऊंची आठवण होत त्यांनी त्यावेळी स्वर्गीय भाऊंनी त्यांच्या व्यवसायासाठी केलेली मदतीची आठवण त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.
यावेळी औद्यगीक वसाहत चेअरमन महेंद्र सोनार,भा.ज.पा ता.सरचिटणीस विजय बाविस्कर,कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस,व सो. मी. प्रमुख मिलिंद वाणी,कामगार आघाडी शहराध्यक्ष विलास लोहार, विधानसभा, उद्योग आघाडी ता.अध्यक्ष विठ्ठल पाटील,अनु.ज.शहराध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी,लक्ष्मण पाटील, नितीन चौधरी,कैलास लोहार,राजू तडवी, भूपेंद्र पाटील आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


No comments