शिरपूर येथील विकास सेन यांचा वाढदिवस ठरला सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आदर्श वाढदिवस प्रसंगी फूलमाळा, शाल, श्रीफळ, बुके, व कुठलेही आर्टिफ...
शिरपूर येथील विकास सेन यांचा वाढदिवस ठरला सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आदर्श
वाढदिवस प्रसंगी फूलमाळा, शाल, श्रीफळ, बुके, व कुठलेही आर्टिफिशियल गिफ्ट न घेता एकत्र केले अकराशे किलो धान्य
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो : शिरपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शिरपूर शहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांच्या २ जुन रोजी वाढदिवस प्रसंगी त्यांनी आपल्या सर्वच मित्र प्रेमी, समाज बांधव यांना विनम्रतापूर्णक आवाहन केले होते की, माझ्या वाढदिवस प्रसंगी मला शुभेच्छा द्यायला येतांना कुठले ही, फूलमाळा, शाल, श्रीफळ, बुके, व आर्टिफिशियल गिफ्ट न आणता मला फक्त दोन किलो धान्य द्यावे जेणेकरून गोळा झालेले धान्य मी, बारा ही महिने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार गरजू बांधवांच्या कुटुंबीयांना आपल्या सर्वांच्या साक्षीने वाटप करेल फूलमाळा, बुके इत्यादि वस्तु ह्या माझ्या काहीही कामाचे नाहीत पण आपण दिलेले दोन किलो धान्य मुळे एखाद्या निराधार आणि गरजू बांधवांचे एकावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी उपयोगी ठरेल या उद्देशाने जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांची सेवाभावी संकल्पना त्यांच्या प्रत्येक हितचिंतकांनी मनावर घेत त्यांना त्यांच्या वाढदिवस प्रसंगी आपआपल्या इच्छेनुसार धान्य स्वरुपात शुभेच्छा दिल्या. प्रसंगी सर्वच दानशूर मंडळी, समाज बांधव, मित्र परिवार, शुभचिंतक हितचिंतक यांनी दिलेले धान्य रुपी सहकार्याने विकास सेन यांच्या वाढदिवस प्रसंगी त्यांच्या जवळ अकरा क्विंटल धान्य एकत्र झाले, विकास सेन यांनी एकत्र झालेले धान्य निराधार आणि अत्यंत गरजू बांधवांना , शहरातील शासकीय प्रशासकीय अधिकारी व सर्वच दानशूर बांधवांच्या साक्षीने वाटप करण्याचें आवासन दिले आहे.
वाढदिवस प्रसंगी दानशूर मंडळी यांनी दिलेले धान्यला विविध ठिकाणा पासून एका ठिकाणी एकत्र करण्यासाठी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी प्रतिष्ठान चे विश्वस्त गोपाल वरसाळे सर, व मित्र परिवार यांनी मेहनत घेतली जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांनी धान्य स्वरुपाची मदत करणाऱ्या सर्वच दानशूर मंडळी समाज बांधव, मित्र परिवार यांचे आभार मानले आहे व लवकरच एकत्र आलेले ११ किंटल धान्य निराधार व गरजू बांधवांना वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे.वाढदिवस प्रसंगी घेतलेल्या सेवाभावी निर्णयाचे सर्वच जनते कडून विकास सेन यांचे कौतुक करण्यात येत आहे.

No comments