आपल्या यशाचा उपयोग देश आणि समाजासाठी करा ! प्रशांत डिक्कर. ------------------------------------------- - स्वाभिमानी चे वतीने विद्यार्...
आपल्या यशाचा उपयोग देश आणि समाजासाठी करा ! प्रशांत डिक्कर.
-------------------------------------------- स्वाभिमानी चे वतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा
त्रिसूत्री अंगी बाळगली तर आपल्या आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करता येत
---------------------------------------------
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा उपयोग देश आणि समाजासाठी करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे.जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा ही त्रिसूत्री अंगी बाळगली तर आपल्या आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केले.
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणीं कौतुक करण्याचा मानस स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.त्या अनुषंगाने जळगाव जा. तालुक्यातील पिपळगाव काळे येथील बी.एस.पटेल महाविद्यालयात स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा दिनांक ५जून रोजी आयोजीत करण्यात आला होता.त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रब्बानजी देशमुख तर प्राचार्य मुकुंद इंगळे, गणेश देशमुख, प्रा. मंगेश निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः भारत मातेच्या प्रतिमा समोर दीप प्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले. या वेळी विद्यालयातील जान्हवी पुरुषोत्तम वडोडकर या विद्यार्थिनी सह २४९ विद्यार्थ्यांना संघटनेचे प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्याच्या अडीअडचणी आणि शैक्षणिक मार्गदर्शना साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सदैव विद्यार्थ्यांसोबत सोबत असल्याचे मत शेवटी प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केले. तर विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून त्याच्या सर्वांगीन विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून रब्बानी देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजित तडवी यांनी केले.तर संचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे प्रा.किशोर गवई आणि मधुकर तायडे यांनी केले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी,शिक्षक आणि परिसरातील पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.पसायदाना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


No comments