Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणा

  चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणा  मा.आमदार लताताई सोनवणे यांचे कडे रुग्णांच्या नातेवाइकांनी केली तक्रार  मा.आमदार लताताई सोनवणे नेशन म...

 चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणा 

मा.आमदार लताताई सोनवणे यांचे कडे रुग्णांच्या नातेवाइकांनी केली तक्रार 

मा.आमदार लताताई सोनवणे

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणा करीत रुग्णांनाच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची तक्रार मा.आमदार लताताई सोनवणे यांचे कडे रुग्णांच्या नातेवाइकांनी केली असुन कोणतेही आजार असल्यास जळगाव येथे हलविण्याचा सल्ला देतात व उपचार करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार विधानसभा क्षेत्रातील रुग्णांकडून नातेवाईकांन कडून कायम तक्रारी येत असुन येथिल हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार यावी अशी मागणी ही केली जात आहे तर जळगावी पेशंटला हलविण्यात येते वेळी काही अपरिहार्य घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहिल अशी विचारणाही केली जात आहे विशेष म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा असुन ही काय कारण आहे की पेशंटला जळगावच हलविण्यात येते तर ज्या महिला रुग्ण डिलिवरी करीता येतात त्यांना ही जळगावला पाठवतात तर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तर मा.आमदार लताताई सोनवणे यांचे कडून उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांना पत्राद्वारे सुचना केली असून लवकरच होणारी असुविधा दूर होईल असा विश्वास रुग्णांसह नातेवाईक यांनी व्यक्त केला



No comments