जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली रॅलीचे नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था या रॅलीत स...
जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली
रॅलीचे नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था या रॅलीत सहभागी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
आज दि. ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली.
सविस्तर असे की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात भव्य सायकल रॅली वनविभागाकडून काढण्यात आली होती यात शहरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ह्या रॅलीला सुरुवात करण्यात आली समाजात जनजागृती व्हावी व वृक्षतोड प्रत्येकाने थांबवावे यासाठी प्रत्येक सायकलवर विशिष्ट स्लोगन लावण्यात आले होते या स्लोगन द्वारे जनजागृती करून वन विभाग व समाजातील प्रत्येक घटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणा वर वृक्ष लागवडीचे यावर्षी नियोजन करण्यात येईल तसेच यावर्षी तापमानाचा पारा ४७ डिग्री पर्यंत गेल्याने प्रत्येक माणसा च्या मनात आपणही वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे अशी दृढ इच्छा समाजातील प्रत्येक घटकात निर्माण झालेली आहे त्यामुळे आज च्या रॅलीचे नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था या रॅलीत सहभाग सहभागी होताना दिसत आहे रॅली मोठ्या प्रमाणात निघाल्याने याच्या फायदा चोपडा शहरवासीयांना नक्कीच होईल असेही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्र चोपडा (प्रादेशिक) व सामाजिक वनीकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमेश हाडपे सहा.वन संरक्षक (वनी व वन्यजीव ) चोपडा श्री. बी. के. थोरात म.वनक्षेत्रपाल चोपडा (प्रादेशिक)यांच्यासह चोपडा शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण दिवस निमित्ताने जनजागृती मोहीम राबविण्यात आली.




No comments