adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मा.श्री. भगवानजी चित्ते साहेब

  नाभिक समाजातील सर्वच महापुरुषांच्या लेखाजोखा सांगणारा ज्ञानवंत,अभ्यासू, तत्त्वज्ञानी, १९४७ च्या भारत स्वातंत्र्य पूर्वीच्या इतिहास सांभाळण...

 नाभिक समाजातील सर्वच महापुरुषांच्या लेखाजोखा सांगणारा ज्ञानवंत,अभ्यासू, तत्त्वज्ञानी, १९४७ च्या भारत स्वातंत्र्य पूर्वीच्या इतिहास सांभाळणारा धुळे जिल्ह्यातील नाभिक समाजातील एकमेव ज्ञानवंत माणूस म्हणजेच मा.श्री. भगवानजी चित्ते साहेब 

 मा.श्री. भगवानजी चित्ते साहेब 


🙏🙏🙏🙏🙏🙏

नाभिक समाजातील इतिहासात जे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे जीवन चरित्र तसेच नाभिक समाजासाठी त्यांनी केलेलं कार्याविषयीची सर्व महिमा आदरणीय भगवान भाऊ चित्ते यांच्या स्वलिखीत संग्रही आहे.श्री.भगवानभाऊ चित्ते यांना नाभिक समाजाच्या महापुरुषांच्या अभ्यासाविषयी एक तत्त्वज्ञानी म्हणून आपण घोषित केले तरी चालेल. परंतु  माझ्या निर्देशनास असे आले की,उभ्या महाराष्ट्रात आपल्या नाभिक समाजाच्या इतिहास कोणत्याच समाज बांधवाकडे इतका विस्तृतपणे नसेल इतका इतिहास फक्त आणि फक्त भगवान भाऊ चित्ते यांच्याकडे आहे. आपल्या समाजातील प्रत्येक महापुरुषांच्या बद्दल एक ते दीड तास हजारो लोकांच्या समोर त्यांचा इतिहास मांडणारा भगवान भाऊ चित्ते हे धुळे जिल्ह्यातील एकमेव समाज वक्ता, समाजातील सर्वच घडामोडीतील इतिहास सांगणारा हा माणिक मोती नाभिक समाजात जन्माला आलेला आहे हा नाभिक समाजाला गर्व आहे.ज्या ज्या  वेळेस महापुरुषांचे विचार त्यांच्या अमृत वाणीतून आपण ऐकतो त्या त्या  प्रत्येक वेळेस समाज बांधव त्यांना मानाचा साष्टांग दंडवत केल्याशिवाय राहणार नाहीत.अशा या सोज्वळ माणसाच्या विचाराशी जर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव  आपण त्यांचा सोबत राहिलो तर समाजाच्या  १००% विकास होईल यात तिळमात्र शंका नाही. तसेच या माणसाला नाभिक समाजाने खांद्यावर घेतलं तर समाजाच्या इतिहास सर्वांनाच सर्वश्रुत होईल व सर्वांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनात निश्चितच बदल होईल यात देखील तिळ मात्र शंका नाही. आपल्या समाजाचे खरे वास्तव पाहता समाजाच्या संघटना भरपूर आहेत संघटनेचे पदाधिकारी देखील भरपूर आहेत, परंतु नाभिक समाजाच्या पूर्ण खरा इतिहास कोणत्याही पदाधिकाऱ्याला माहिती आहे तो आज पावेतो एकही समाजातील जेष्ठ मंडळीनी जनसामान्य पर्यन्त पोहचण्याचे कार्य केले नाही. फक्त उच्च पदावर राहून आपल्या पदाचा करारनामा दाखवला आहे. परंतु खऱ्या व सखोल इतिहासाची कोणत्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना  जाणकारी नाही‌. त्यांनाच महापुरुषांचा इतिहास मालूमात नाही तर समाजा पूढे ते इतिहास मांडू शकणार नाहीत. म्हणून समाजाचा खरा इतिहास. ज्यांना मालूमात आहे त्यांचा विचाराशी आपण सहमत होऊन त्यांचा कार्याला पुढे नेऊयात व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण नाभिक समाज या नात्याने त्यांना खंबिर पणे पाठबळ देऊयात अस माझ मत आहे. महापुरुषांचा इतिहास खरोखर समजून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त श्री.भगवान भाऊ चित्ते साहेब यांना पाठबळ द्यावे. कारण भगवान भाऊ चित्ते  हजारो लोकांच्या सभेमध्ये बोलणारा स्पष्ट वक्ता, ज्ञानवंत, गुणवंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्या समाजात जन्माला आलेले या माणसासोबत आपण सदैव पाठीशी उभे राहू यात आणि त्यांच्या कार्याची दखल सर्वांनी घेऊयात व वेळोवेळी त्यांना मदत करूया हीच आग्रहाची विनंती जेणेकरून नाभिक समाजाला योग्य न्याय व दिशा मिळेल.


         शब्दांकन 

श्री.रामचंद्र येशी

महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा उपाध्यक्ष


No comments