adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

  चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी  चोपडा शहरात दिनांक ३१ मे शुक्रवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

 चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी 


चोपडा शहरात दिनांक ३१ मे शुक्रवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक: हेमकांत गायकवाड)

 सालाबाद प्रमाणे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्ताने चोपडा शहरात दिनांक ३१ मे शुक्रवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील धनगर वाड्यात व छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा व प्रतिमाचे पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडतीचे देविदास धनगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पं स चे माजी सभापती आत्मारामभाऊ म्हाळके, वसुंधरा लांडगे अमळनेर, जितेंद्र पाटील थोरगव्हान, विठ्ठल बोरसे, ज्ञानेश्वर धनगर कमळगांव, नगरसेविका सरला शिरसाठ, आर सी भालेराव,सुरेश न्हायदे मंगरुळ, चंद्रकांत सुलताने बोरअजंटी, सचिन भालेराव अंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी,राजकिय सामाजिक क्षेत्रात निवड झालेले पदाधिकारी व विशेष नैपुण्य मिळालेले मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ नरेंद्र शिरसाठ यांनी केले तर सुत्रसंचलन प्रदिप नायदे यांनी केले,व आभार दत्तात्रय धनगर यांनी मानले .संध्याकाळी ६ वाजेनंतर धनगर वाड्यापासुन छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. तरी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक महेंद्र धनगर 

सुभाष शिरसाठ,आबा शिरसाठ,सुरेश शिरसाठ, राहुल शिरसाठ, उमेश शिरसाठ, योगेश कंखरे, शाम धामोळे,भगवान नायदे,नंदलाल धनगर निखिल शिरसाठ विजय शिरसाठ,भुषण शिरसाठ दिपक भालेराव,समाधान शिरसाठ राजेंद्र धामणे,चेतन बोरसे,भिकन धनगर,डि एस धनगर,बी एस हळपे, योगराज नायदे, डॉ अशोक कंखरे, सचिन सांगोरे सह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments