मोठा वाघोदा - निंभोरा पंतप्रधान ग्रामसडक रस्त्यावरील खड्डे बुजवून गतिरोधक बनविण्यात यावेत - मागणी रस्त्यावर भरवस्तीत गतिरोधक नसल्याने दुचा...
मोठा वाघोदा - निंभोरा पंतप्रधान ग्रामसडक रस्त्यावरील खड्डे बुजवून गतिरोधक बनविण्यात यावेत - मागणी
रस्त्यावर भरवस्तीत गतिरोधक नसल्याने दुचाकी चारचाकी ट्रक ट्रॅक्टर सुसाट वेगाने चालवत असून मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही
प्रतिनिधी/ मुबारक तडवी मोठा वाघोदा ता रावेर
(संपादक: हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु येथील १ कि मी पंतप्रधान ग्राम सडक अंतर्गत बनविलेल्या फाटा ते निंभोरा रस्ता शनि मंदीर पर्यंत १ कि.मी अंतरावरील सिमेंट कॉक्रीट रस्त्यावर खोल व लांब भेघ चारी व लहान मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांच्या प्रमाणात ही प्रचंड वाढ झाली आहे तसेच रस्त्यावर भरवस्तीत गतिरोधक नसल्याने दुचाकी चारचाकी ट्रक ट्रॅक्टर सुसाट वेगाने चालवत असून मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सावदा यांनी जातीने लक्ष देवून उपरोक्त परिसरातील रस्त्यांवरील चरी भेगा व खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत तसेच रस्ता दरम्यान अंगणवाड्याचे बाळगोपाळ जि प शाळा चे विद्यार्थी व वस्तीत नेहमी लहान मोठ्यासह वयस्कांची रहदारी खुप प्रमाणात असते रस्ता ओलांडताना अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत असतात
त्यासाठी वाहनांच्या गतीस आळा घालण्यासाठी गती अवरोधक गतिरोधक बनविण्यात यावेत अशी मागणी मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील रहिवाशांकडून होते आहे तसेच पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्ड्यांत पाणी का पाण्यात खड्डे आहेत हेच वाहन चालकांना वाहन चालवताना उमगत नसल्याचे ही वाहनधारकांतून बोलले जाते तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष देवून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे तसेच अंगणवाडी शाळा व ठिकठिकाणी गतिरोधक बनविण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे


No comments