अडावद आरोग्य केंद्रातील रूग्णांची आ.लताताई सोनवणे यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी चांदसणी ,कमळगाव, पिंप्री येथील शेकडो ग्रामस्थांना पाणी पु...
अडावद आरोग्य केंद्रातील रूग्णांची आ.लताताई सोनवणे यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी
चांदसणी ,कमळगाव, पिंप्री येथील शेकडो ग्रामस्थांना पाणी पुरी खाल्याने झाली होती विषबाधा
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता. चोपडा - मंगळवार पासून चांदसणी ,कमळगाव, पिंप्री येथील शेकडो ग्रामस्थांना पाणी पुरी खाल्याने झालेल्या विषबाधा मुळे अडावद प्रा.आ.केंद्रात उपचार घेणाऱ्या रूग्णांची आज गुरूवार रोजी दुपारी चोपडा विधान सभेच्या आ. लताताई सोनवणे यांनी भेट घेत उपचार घेणारे रूग्णांच्या तब्बेतीची आस्थेवाईक पणे चौकशी करीत रूग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला.यावेळी आरोग्य यंत्रणेचाही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. कोमल गावंडे,आरोग्य सहाय्यक वाय.आर.पाटील.सरपंच बबनखा तडवी ,ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे,सचिन महाजन,लोकेश काबरा,पी.आर.माळी,पी.डी.महाजन,हरिष पाटील,जावेद खान, रियाजअली कालू मिस्तरी, संजय पाटील,नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments