adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड !

  जळगाव : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड ! तरुणास बेकायदेशीर अटक भोवली ; मानवाधिकार आयोगाकडू...

 जळगाव : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड !


तरुणास बेकायदेशीर अटक भोवली ; मानवाधिकार आयोगाकडून पीडितास भरपाई देण्याचा निकाल !

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- जळगाव प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

बेकायदेशीरपणे अटक करून तक्रारदार तरुणाकडून खंडणी उकळल्याच्या आरोपात मानवाधिकार आयोगाने यावल पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी, अशा तिघांना प्रत्येकी एक लाख अशी तीन लाखांची भरपाई संबंधित तक्रारदारास देण्याचा निकाल दिला आहे.

साधारण सात वर्षांपूर्वी १२ जानेवारी २०१७ ला यावल पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे, पोलिस कर्मचारी कैलास इंगळे, किरण ठाकरे, कदीर शेख, पोलिस वाहनावरील चालक किनगाव (ता. यावल) येथील फर्निचर व्यावसायिक सद्दाम शहा खलील शहा (वय २५) याच्या घरी आले. त्यांनी त्याचे नाव विचारून 'आमच्यासोबत चल', असे सांगत पोलिस ठाण्यात आणले. तुझ्याविरुद्ध एका मुलीने बलात्काराची तक्रार दिल्याचे सांगून सद्दाम शहा याला बेकादेशीर डांबून ठेवले व मारहाण करून धमकावले. सोबतच तरुणाकडून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यापैकी काही रक्कम वसूलही केली होती. याबाबत सद्दाम शहा याने तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे शहा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार अखेर जिल्हा न्यायालयात दाद मागितली. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली.

मानवाधिकार आयोगाकडे सुनावणीत सद्दाम शहा याने आवश्यक सर्व दस्तऐवज, व्हिहिओ फुटेज, संशयितांनी बेकायदेशीर ताब्यात घेतल्यानंतर, तक्रारदाराच्या पैशांवर दारु-मटण पार्टी आदी सर्व पुरावे सादर केले. काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नुकताच आयोगाने निकाल दिला आहे. प्राप्त पुराव दस्तऐवजांच्या अधारे यावलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, कर्मचारी कैलास इंगळे आणि किरण ठाकरे दोषी आढळले. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड भरपाई म्हणून तक्रारदार सद्दाम शहा यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

मानवाधिकार आयोगाने आपल्या निकालात नमूद केल्याप्रमाणे सहा आठवड्यांच्या आत ही रक्कम तक्रारदाराला अदा करायची होती. मात्र, अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने तक्रारदार सद्दाम शहा याने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, यावलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे निवृत्त झाले असून, निवृत्तीनंतरचे वेतन थांबवून ठेवण्यात कळते. तर कैलास इंगळे, किरण ठाकरे पोलिस दलात कार्यरत आहेत.

No comments