adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडली मुर्ती आणि पादुका

  विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडली मुर्ती आणि पादुका पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या...

 विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडली मुर्ती आणि पादुका


पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या 

 प्रतिनिधी: पंढरपूर (सोलापूर) 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. तर विष्णुबालाजी रुपातील ३ ते ४ फूट उंची असलेली मूर्ती सापडली. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते. त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याच समजले. एक ६ बाय ६ फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण ६ वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच जुनी नाणी व दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments