📚📚📝 📝न.प.प्राथ.शाळा.क्र.३ शिरपूर येथे माहे जुलै २०२४ ची शिक्षणपरिषद संपन्न! 📚📚📝📝 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शिरपूर (संपादक ...
📚📚📝📝न.प.प्राथ.शाळा.क्र.३ शिरपूर येथे माहे जुलै २०२४ ची शिक्षणपरिषद संपन्न! 📚📚📝📝
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शिरपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शिरपूर:- आज दि.३१ जुलै रोजी न.प.शा.नं.३ शिरपूर येथे माहे जुलै ची शिक्षणपरिषद घेण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न.प.शिरपूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अनिल बाविस्कर साहेब हे होते.यावेळी न.प.शा.नं.१ते९ चे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,पां.बा.मा.हायस्कूलचे इ.५वी ते ८वी च्या वर्गातील प्रातिनिधीक स्वरूपात २ शिक्षक हजर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इ.४थी च्या विद्यार्थिनींना सुंदर असे ईशस्तवन तसेच स्वागत गीत सादर केले. सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते झाले.सूत्रसंचलन श्री.इंगोले सर यांनी केले.प्रास्ताविक श्री पावरा सर यांनी केले.यावेळी शिक्षण परिषदेच्या नियोजनानुसार १ली तासिका सन्माननीय केंद्रप्रमुख साहेब यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला उतारा न वाचता येण्याची कारणे , वजाबाकी गुणाकार भागाकार विद्यार्थ्यांना न येण्याची कारणे, प्रारंभिक स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवावे , FLN उद्दिष्ट प्राप्तीसाठी कोणकोणते उपक्रम राबवावे प्रत्येक वर्ग शिक्षक यांच्याशी सखोल चर्चा करून अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच कृती कार्यक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थी पुढच्या अध्यस्तरावर येण्यासाठी कशा पद्धतीने अंमलबजावणी करावी याविषयी प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी श्री. सुरवाडकर साहेब यांनी सुद्धा सखोल मार्गदर्शन केले. शेवटच्या तासिकेमध्ये केंद्रातील शैक्षणिक गरजांवर व पुढील नियोजन याविषयी सखोल मार्गदर्शन केंद्रप्रमुख बाविस्कर साहेब यांनी केले सदर शिक्षण परिषद मा. मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी श्री. प्रशांत सरोदे साहेब, सभापती शिक्षण मंडळ श्री. राजेंद्र जी अग्रवाल साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. गणेश सुरवाडकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, शिक्षण विभाग प्रमुख श्री. मोहन चौधरी साहेब, विशेष साधन व्यक्ती पि .के. बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. शिक्षण परिषदेच्या यशस्वी करण्यासाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ चे प्रभारी मुख्याध्यापक पावरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यवंशी मॅडम, खरे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
No comments