adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार मोफत वीज, राज्य सरकारने सुरू केली योजना

 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४" ची केली सुरूवात शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार मोफत वीज,  राज्य सरकारने सुरू केली योजना ने...

 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४" ची केली सुरूवात



शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार मोफत वीज,  राज्य सरकारने सुरू केली योजना

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो मुंबई

(संपादक हेमकांत गायकवाड )

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्यासाठी कल्याणकारीयोजना सुरु केली असून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, याकरिता राज्य सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४' सुरू केली आहे. सदरील योजने अंतर्गत,   राज्य सरकार ने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्यासाठी कल्याणकारीयोजना सुरु केली आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज संबंधित समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य सरकार ने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४" ची सुरूवात केली आहे. या योजने अंतर्गत एप्रिल २०२४ पासून ७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमता असणारे कृषि पंपाचा उपयोग करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मार्च २०२९ पर्यंत प्रभावीपणे असणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप लाभ मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. याला पाहता 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४' ची सुरूवात करण्यात आली आहे. येत्या काळात या योजनेत कोणते बदल झाले आणि त्याचा काय परिणाम झाला याचा आढावा घेण्यासाठी तीन वर्षांनंतर बैठक घेतली जाणार आहे. योजना चालवण्यासाठी राज्य सरकार ने पर्याप्त बजेट वाटप केले आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी ६९८५ करोड रुपये वाटप केले आले आहे. याशिवाय वीज दरामध्ये सूटसाठी अतिरिक्त ७७७५ करोड रुपये देण्यात आले आहे. अशा प्रकारे,राज्यभरातील शेतकऱ्यांना एकूण १४,७६० कोटी रुपयांची वीज दरात सूट दिली जाणार आहे.

योजनेसाठी पात्रता काय ?

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील फक्त शेतकरीच घेतील.

७.५ HP पर्यंतचे पंप असलेले शेतकरीच या मोफत योजनेचा लाभ घेऊ शकतील.

जर पंप ७.५ HP पेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला वीज बिल भरावे लागेल.

 कागदपत्रे-

आधार कार्ड

पत्त्याचा पुरावा

किसान कार्ड

वीज बिल

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकार साईज फोटो 


No comments