adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जगदिश सु.ल.मानवतकर यांचा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या ( ABS) धरणे आंदोलनला पाठिंबा

  जगदिश सु.ल.मानवतकर यांचा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या ( ABS) धरणे आंदोलनला पाठिंबा   नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशिम (संपादक:- ह...

 जगदिश सु.ल.मानवतकर यांचा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या ( ABS) धरणे आंदोलनला पाठिंबा  


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशिम

(संपादक:- हेमकांत गायकवाड )

जगदिश सु.ल.मानवतकर यांचा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या ( ABS) धरणे आंदोलनला पाठिंबा  सविस्तर वृत्त असे की , अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या ( ABS) चे वतीने वाशीम  जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज दिनांक १८ जुलै २०२४ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते .


यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद लगड व विनोद आवारे यांना ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष  व बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव जगदीश मानवतकर सर यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले . 

यावेळी महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वाशिम मध्ये बसवायला हवा , लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाची समिती तयार व्हावी , शासनाने अण्णाभाऊ साठे यांना यावर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा , मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्वरित रोखवावे अशा विविध विषयांवर जगदीश मानवतकर यांनी आपले विचार मांडले . यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स चे सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होतो       


      
या ठिकाणी ए.आय.बी.टी.एस.चे संविधान ढोले ,देवा भाऊ गवळी ,अक्षय इंगोले ,  नितीन बांगर , गजेंद्र राऊत , बबनराव वाळके यांच्यासह बहुजन भारत पार्टीचे मुकेश ताजने , बादल वानखेडे , सदानंद ढोले , सोनू मनेर , मारोती मनेर यांची सुद्धा उपस्थिती होती.



No comments