adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन

 स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- रविंद्र कोळी. (संप...

 स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- रविंद्र कोळी.

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 17 जुलै रोजी *स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय व खाजगी प्राथमिक शाळा वर्डी*

येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले होते. विठू नामाचा गजर करत बालगोपालांनी दिंडीत सहभाग घेतला. अगोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन शामराव चव्हाण व खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर यांनी विठू माऊली व संतांच्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन केले. मठाधिपती श्री दिवाकर नाथ महाराज यांनी विठ्ठलाची आरती केली.  विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी अतिशय उत्साहाने फुगडी खेळत, टाळ, मृदुंगाच्या जयघोष करत, व विठू नामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला. 

    यावेळी शालेय समिती सदस्य श्री भरत शामराव चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही दिंडीत सहभाग घेतला. पालकांनीही चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

No comments