Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गजानन काळे यांच्या आमरण उपोषणाला AIBTS चे समर्थन .

  गजानन काळे यांच्या आमरण उपोषणाला AIBTS चे समर्थन . मालेगाव नगर परिषद येथील बऱ्याच समस्या त्यामध्ये रस्ते , पाणी ,आरोग्य ,फलक , योजनांचा अ...

 गजानन काळे यांच्या आमरण उपोषणाला AIBTS चे समर्थन .


मालेगाव नगर परिषद येथील बऱ्याच समस्या त्यामध्ये रस्ते , पाणी ,आरोग्य ,फलक , योजनांचा अभाव या व इतरही मागण्यासाठी गजानन काळे यांचे आमरण उपोषणाला 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो चीफ

(संपादक:- हेमकांत गायकवाड )

सविस्तर वृत्त असे की , मालेगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे हे मालेगाव नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.मालेगाव नगर परिषद येथील बऱ्याच समस्या त्यामध्ये रस्ते , पाणी ,आरोग्य ,फलक , योजनांचा अभाव या व इतरही मागण्यासाठी गजानन काळे हे आमरण  उपोषणाला बसलेले आहेत.त्यांच्या उपोषणाला भेट देण्याकरिता ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष जगदिश सु. ल. मानवतकर हे गेले असता जगदिश सु. ल. मानवतकर यांनी मालेगाव नगर पंचायत चे मुख्याधकारी साहेबांनी त्वरित या मागण्यांकडे लक्ष द्यावे .उपोषणकर्ते गजानन भाऊ काळे यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या अन्यथा ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना मालेगाव मध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशारा जगदिश सु. ल. मानवतकर यांनी दिला आहे.यावेळी AIBTS शाखेचे मालेगाव ता.अध्यक्ष सागर डोंगरे, ता.उपाध्यक्ष राजु गवळी ,बंटी लांडगे ,रवी गवळी,अंकुश सावंत , नरेंद्र गायकवाड , सोहेल शेख ,शे. जुनेद यांची उपस्थिती होती.

No comments