Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निमगव्हाण येथील तापी नदीवरील रोडावर पडलेल्या खड्ड्यांपासुन वाहन धारकांना मिळणार मुक्तता

  निमगव्हाण येथील तापी नदीवरील रोडावर पडलेल्या खड्ड्यांपासुन वाहन धारकांना मिळणार मुक्तता पुलावरील रस्त्याचे  काम सुरू नेशन महाराष्ट्र न्य...

 निमगव्हाण येथील तापी नदीवरील रोडावर पडलेल्या खड्ड्यांपासुन वाहन धारकांना मिळणार मुक्तता


पुलावरील रस्त्याचे  काम सुरू

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो चीफ 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - निमगव्हाण नजीकच्या तापी पुलाची पुलावरील रस्त्यावरील खड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.त्याच्या दुरुस्तीला आता सुरुवात करण्यात आली.संपूर्ण पुलावरील डांबरीकरणाचा काँक्रिटीकरणापर्यंतचा पृष्ठभाग जेसीबीच्या साहाय्याने काढून घेतला जात आहे.तसेच कामगारांद्वारे पुलाची दुरुस्ती केली जात आहे.सद्यस्थितीत पुलावरील संपूर्ण खड्डेमय डांबरीकरण काढून घेतले जात आहे.पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे,अशी माहिती सिद्धार्थ शिरसाठ (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) सा.बा.उपविभाग चोपडा यांनी दिली.




No comments